राज ठाकरे, अमित ठाकरे यांचे मालवणात होणार जल्लोषी स्वागत

मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांची माहिती

मालवण : मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोकण दौऱ्यात १ व २ डिसेंबर रोजी मालवण तालुक्यात असणार आहेत. यावेळी मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्यासह मनसे नेते नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, शिरीष सावंत यांचीही उपस्थिती असणार आहे. राज ठाकरे व अमित ठाकरे यांचे मालवण दौऱ्यात चौके, कुंभारमाठ व मालवण भरड या ठिकाणी मनसे व मनविसे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या वतीने जल्लोषात स्वागत केले जाणार आहे, अशी माहिती मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी दिली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे १ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजता चौके मालवण येथे भव्य स्वागत होईल, त्यानंतर ३ वाजता कुंभारमाठ येथे स्वागत व जानकी सभागृहात कार्यकर्त्यांसह सोबत बैठक होणार आहे. यावेळी अन्य पक्षातील अनेक जणांचा पक्ष प्रवेश होणार आहे, त्यानंतर ४ वाजता भरड येथे स्वागत. ४.३० वाजता चिवला बीच किल्ला रिसॉर्ट येथे मुक्काम ठिकाणी नागरिक, विविध शिष्टमंडळ व पत्रकार यांच्याशी संवाद. २ डिसेंबर रोजी सकाळी राज ठाकरे आंगणेवाडी देवीचे दर्शन, तेथून कणकवली येथे निघणार आहेत. अशी माहिती तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी दिली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!