बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शिलेदार जाहीर
बबन शिंदे विधानसभा क्षेत्र प्रमुख ; तर महेश राणे, विश्वास गावकर यांच्याकडे तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी
मालवण | कुणाल मांजरेकर
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आज जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये मालवण तालुक्यातून कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्रप्रमुख पदी बबन शिंदे यांची निवड करण्यात आली असून तालुकाप्रमुख पदी महेश राणे ( आचरा, आडवली, मसुरे, सुकळवाड विभाग ) आणि विश्वास गावकर (देवबाग, कट्टा, पेंडूर, मालवण शहर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
ब्रि. सुधीर सावंत यांनी जाहीर केलेल्या कार्यकारणीत जिल्हाप्रमुख म्हणून संजय आग्रे ( कणकवली, देवगड, वैभववाडी, मालवण, कुडाळ), महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर ( कणकवली, देवगड, वैभववाडी, मालवण, कुडाळ), संदेश सावंत- पटेल (विधानसभा क्षेत्रप्रमुख कणकवली देवगड वैभववाडी), उपजिल्हाप्रमुख महेंद्र सावंत, शेखर राणे, विश्राम रावराणे.
तालुकाप्रमुख – योगेश उर्फ बंटी तुळसकर (कुडाळ), भूषण परुळेकर ( जानवली, फोंडा, हरकुळ, कलमठ, कळसुली, नाटळ, कणकवली शहर), शरद वायंगणकर (कासार्डे, खारेपाटण), विलास साळसकर (शिरगांव, फणसगावं, पोंभुर्ले, किंजवडे, देवगड शहर), अमोल लोके (मिठबाव, पडेल, पुरळ, जामसंडे शहर) वैभववाडी – संभाजी रावराणे, कणकवली तालुका समन्व्यक – सुनील पारकर यांचा समावेश आहे.