कणकवली वागदे पेट्रोल पंपांनजिक अपघात ; दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू

कणकवली : पुणे येथून गोवा येथे जाणाऱ्या ३० हुन अधिक मोटार सायकलस्वारांच्या ताफ्यातील एका मोटारसायकलस्वाराचा कणकवली वागदे पेट्रोलपंपानजीक असलेल्या वळणावर दुभाजकावर आदळून मृत्यू झाला. अभिषेक संजय देसाई (वय २२ रा. पुणे हडपसर) असे मृत युवकाचे नाव आहे. ही दुर्घटना गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता घडली. मुंबई गोवा महामार्गावरील वाढते अपघात चिंतेचे कारण बनले आहेत.

पुण्याहून गोव्याकडे एका कार्यक्रमासाठी ३२ ते ३५ जणांचा बुलेट गाड्यांचा ताफा जात होता. यातील गाडी क्रमांक एम. एच. १२ टी. एम. ८७०३ घेऊन अभिषेक देसाई हा मित्रांसह गोव्याच्या दिशेने चालला होता. वागदे येथे तो आला असता पेट्रोल पंपानजीकच्या वळणावर रस्त्याच्या बाजूच्या दुभाजकावर मोटारसायकल आदळली व डोक्याला मार लागल्याने दुदैवाने त्याचा जागीच मृत्यू झाला.
यावेळी वाहतूक पोलीस विनोद चव्हाण, दीपक मेस्त्री होमगार्ड, नितेश गुरव, सिद्धेश पाटील, हायवे ट्राफिकचे देवानंद मिटबावकर घटनास्थळी दाखल झाले होते. अपघाताची कणकवली पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सूरु होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3601

Leave a Reply

error: Content is protected !!