मालवण येथील रक्तदान शिबिरात ४५ रक्तदात्यांचे रक्तदान

एकता मित्रमंडळ मालवण आणि दैवज्ञ हितवर्धक समाज मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

मालवण | कुणाल मांजरेकर

एकता मित्रमंडळ मालवण आणि दैवज्ञ हितवर्धक समाज मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ओरोस रक्तपेढी याच्या सहकार्याने बाजारपेठ कासारआळी येथील देसाई बिल्डिंग मध्ये घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ४५ जणांनी रक्तदान केले.

शिबिराचे उदघाटन दिलीप हिर्लोस्कर आणि डॉ. जुई ऋषीकेश देसाई यांनी केले. यावेळी माजी नगरसेविका आकांशा शिरपुटे, माजी उपनगराध्यक्षा शर्वरी पाटकर , श्वेता ओरसकर, उमेश सांगोडकर, माजी नगरसेवक उत्तम पेडणेकर, गुरुनाथ नाईक, प्रकाश रेवंडकर, अण्णा कारेकर, विनोद रेवंडकर, हितेंद्र हिर्लोस्कर, अमेय देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिरास माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या. यावेळी रक्तापेढीच्या डॉ. पद्मश्री हळदणकर, सुनील वानोळे, नितीन गावकर, सुरेश डोंगरे , उल्हास राणे यांनी रक्त संकलनाचे काम केले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी उमेश नेरुरकर, अरविंद ओटवणेकर, गणेश प्रभुलकर, गजानन मालंडकर, चंद्रकांत आचरेकर, विनायक निवेकर, किरण कारेकर, अमित कारेकर, अजित पाटनकर, रामेश बेलवलकर, शैलेश मालंडकर, शिवराज धामापुरकर, कृपेश जामसंडेकर, राजा शंकरदास, नेहा शंकरदास- कोळंबकर , बबन वाघ, गुटली हिर्लोसकर , केदार देसाई , ललित मेस्त्री, विद्या मेस्त्री, वैभव मेस्त्री, मिलिंद कडू , ऍड ऋषी देसाई, ऍड. रोहित गरगटे, अभि खानोलकर, राजू कोवळे, किशोर गरगटे, केदार गरगटे, रवींद्र गरगटे, अमित नाईक, गौरव वेर्लेकर, गीतेश वेर्लेकर, राजू गिरकर, नितीन मांणगावकर, नंदा गिरकर , विराज मंदार, मंदार ओरसकर, अमेय देसाई आणि कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!