सिंधुदुर्ग चिरेखाण संघटनेची स्थापना ; अध्यक्ष पदी संतोष गावडे
मालवण | कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिरेखाण व्यावसायिकांची सभा कसाल येथील सिध्दीविनायक हाॅल या ठिकाणी पार पडली. यावेळी सिंधुदुर्ग चिरेखाण संघटनेची स्थापना करण्यात येऊन संघटनेच्या अध्यक्षपदी चौके येथील चिरेखाण व्यावसायिक संतोष गावडे यांची निवड करण्यात आली आहे.
संघटनेच्या उपाध्यक्षपदी मिंलिद साटम – देवगड, दत्ताराम राऊळ – दोडामार्ग, चंद्रकांत हडकर – आचरा, महादेव पारकर – कणकवली तर सचिवपदी माळगांव येथील सुबोध पालव, सहसचिव महादेव मांडलकर व खजिनदार म्हणून दत्तात्रय गावडे यांची निवड करण्यात आली. संघटनेच्या सदस्य पदी अमित साटम, भिकाजी जेढे, सचिन आंबेरकर, विकास हडकर, मदन सातोसकर, प्रविण बर्वे यांची निवड करण्यात आली.
या सभेमध्ये हरित लवादाच्या आदेशा विरोधात सुप्रिम कोर्टात दावा दाखल करून मिळालेल्या स्थगिती बाबत चर्चा करून पुढे कोर्टामध्ये भक्कमपणे आपली बाजू मांडण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच सुप्रिम कोर्टामध्ये स्थगिती मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करून स्थगिती मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संग्राम प्रभूगांवकर यांचे अभिनंदन करून त्यांचे आभार मानण्यात आले. कोर्टातील पुढील वाटचालही श्री. प्रभुगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी चिरेखाण व्यवसाय करत असताना येणार्या अन्य अडचणी बाबत चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व व्यावसायिकांनी संघटीत होऊन पुढील अडचणी वर मात करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही चिरेखाण संघटना रजिस्टर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी संतोष गावडे, मिलिद साटम, लिग्रज, मिलिंद साटम, विकास हडकर, वैभव साळसकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर दत्ताराम राऊळ यांनी आभार मानले. यावेळी जिल्ह्यातील असंख्य चिरेखाण व्यावसायिक उपस्थितीत होते. यावेळी साळसकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर दत्ताराम राऊळ यांनी आभार मानले.