खास. सुप्रिया सुळे तेव्हा का गप्प होत्या ; निलेश राणेंचा सवाल

मंत्र्यांच्या कुटूंबाला कारवाईसाठी बोलावलं म्हणून वाईट वाटलं ? ; त्या घरात कुटुंब रहात नव्हतं का ?

कुणाल मांजरेकर

     शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने चौकशीसाठी पाचारण केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली होती. सुप्रिया सुळे यांच्या या नाराजीवर आता भाजपचे नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका मंत्र्याच्या कुटुंबाला कारवाईसाठी बोलावलं म्हणून वाईट वाटलं, पण खासदार सुळे तेव्हा गप्प का होत्या, जेव्हा १५० माणसं कोणाच्या घरावर चालून आली, घरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्या घरामध्ये कुटुंब रहात नव्हतं का ? असा सवाल निलेश राणेंनी केलाय.

       मंत्री अनिल परबना ईडीने मंगळवारी सकाळी चौकशी साठी बोलावलं आहे. या चौकशी विरोधात शिवसेने सोबतच महाविकास आघाडी मधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामध्ये सुप्रिया सुळे यांचाही समावेश होता. एका कुटुंबाला त्रास देणं योग्य नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील वक्तव्याचा निषेध करण्यासाठी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी राणेंच्या जुहू येथील घरासमोर घुसून आंदोलन केलं होतं. यावेळी नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे हे घरात नव्हते. मात्र त्यांचे कुटुंबीय आणि लहान मुले घरात असताना घरात घुसण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला होता. या घटनेच्या अनुषंगाने माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवर सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “खा. सुप्रिया सुळे यांना एका मंत्राच्या कुटुंबाला कारवाईसाठी बोलावलं म्हणून वाईट वाटलं. पण खासदार सुळे तेव्हा गप्प होत्या जेव्हा १५० माणसं कोणाच्या घरावर चालून आली, घरात घुसायचा प्रयत्न केला. त्या घरामध्ये कुटुंब राहत नव्हतं का ??? स्वतःवर आलं की सगळ्यांना तत्त्वज्ञान आठवतं.” असं निलेश राणेंनी म्हटलं आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!