मालवण येथील रेकॉर्ड डान्स स्पर्धेत हर्षदा गावकर, समर्थ गवंडी प्रथम !
सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजन : स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मालवण | कुणाल मांजरेकर
नवरात्रौत्सवा निमित्ताने शहरातील भरड येथील नवरात्रोत्सव मंडळ भरड मालवण येथे सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित रेकॉर्ड डान्स स्पर्धेत लहान गटात हर्षदा गावकर तर खुल्या गटात समर्थ गवंडी यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. सचिन दिघे यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा ८ ते १४ वर्षे वयोगट आणि १४ वर्षावरील खुला गट अशा दोन गटात घेण्यात आली. दोन्ही गटात मिळून २४ स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला. लहान गटात प्रथम- हर्षदा गावकर, द्वितीय- तन्मय आईर, तृतीय- आरव आईर यांनी तर खुल्या गटात प्रथम- समर्थ गवंडी, द्वितीय- मृणाल सावंत, तृतीय- पूर्वा मेस्त्री यांनी यश मिळविले. स्पर्धेचे परीक्षण संजय शिंदे, चेतन हडकर, मिनू देऊलकर यांनी केले.
विजेत्याना माजी नगरसेविका सौ. महानंदा खानोलकर, श्रीमती मंगल तायशेटे, सौ. दीपा आचरेकर, सौ. प्रगती करंगुटकर, सौ. सिद्धी हळदणकर, सौ. पालेकर आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी सौरभ ताम्हणकर, नुपूर तारी, राकेश सावंत, निषय पालेकर, कुणाल खानोलकर, गौरव लुडबे, फ्रान्सिस फर्नांडिस, संदीप पेडणेकर यांसह इतर उपस्थित होते.