वेंगुर्ल्यातील मातोश्री कला – क्रिडा मंडळाच्या नवरात्र उत्सवाचा विशाल परबांच्या हस्ते बक्षीस वितरण

हिंदू धर्माच्या चालिरिती पुढे ठेऊन स्नेहभाव वृद्धिंगत करण्यासाठी असे उपक्रम आवश्यक : विशाल परब

युवा उद्योजक म्हणून सामाजिक क्षेत्रातील मंडळाना नेहमीच सहकार्य करण्याची ग्वाही

वेंगुले : वेंगुर्ले येथील मातोश्री कला व क्रीडा मंडळाच्या नवरात्र उत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ भाजपचे युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते पार पडला. भविष्यात आपण या मंडळाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन विशाल परब यांनी दरम्यान, विशाल परब यानी वेंगुर्ला तालुक्यातील बहुतांशी नवरात्र मंडळाला भेटी देत देवींचे दर्शन घेतले.

यावेळी भाजप वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सुहास गंवडळकर, माजी शिक्षण सभापती दादा कुबल, माजी नगरसेवक संदेश निकम, दादा केळुसकर, वसंत तांडेल युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर, तुषार साळगावकर, भुषण आंगचेकर, मारूती दोरशान्नटी, आनंद परब, बाबली वायंगणकर आदी उपस्थित होते. यावेळी विशाल परब म्हणाले, खरंतर आज जिल्ह्यात विविध ठिकाणी नवरात्र उत्सवाची धुम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. युवक एकत्र येऊन असे उत्सव जेव्हा साजरे करतात तेव्हा खरं एकीचे बळ स्पष्ट होते. खऱ्या अर्थाने हिंदू धर्माच्या विविध सणांची चालीरीती आज आपण पुढे ठेवू शकतो. या चालीरीती पुढे ठेवून स्नेहभाव वृंदीगत करण्यासाठी हे उपक्रम स्तुत्य आहेत. स्नेहभाव निर्माण करण्यासाठी असे उपक्रम सातत्याने साजरे झाले पाहिजेत. यासाठी एक युवा उद्योजक म्हणून मी तुम्हाला व सर्व मंडळाना सर्वतोपरी सहकार्य व मदत करेन. असे सांगत मंडळाच्या कामाबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले.

यावेळी विशाल परब यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ पार पडला. तर उद्योग क्षेत्रात काम करून दानशूर व्यक्तिमत्व असलेल्या युवा नेते व उद्योजक विशाल परब यांचा विविध मंडळांनी सत्कार केला. यावेळी वेंगुले तालुक्यातील कॅम्प कॉर्नर मित्रमंडळ, गाडीअड्डा मित्रमंडळ बाजारपेठ, श्री देवी भराडी मंदीर, श्रीदेवी सातेरी मंदीर, मातोश्री कला क्रीडा मंडळ, शिरोडा माऊली मंदीर आदी मंडळाच्या नवरात्र उत्सवास भेट देत विशाल परब यांनी दर्शन घेतले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3602

Leave a Reply

error: Content is protected !!