आता मालवणात प्रथमच अद्यावत संगणक आणि सामुग्रीचे सुसज्ज दालन
नामांकित कंपनीचे लॅपटॉप, डेस्टटॉप, गेमिंग लॅपटॉपसह कॉम्प्युटरचे सर्व साहित्य रेडी स्टॉक मध्ये हजर
कुडाळ मध्ये 22 वर्ष सेवा देणाऱ्या नोबल कॉम्प्युटर सेल्स आणि सर्व्हिसची मालवणात शाखा सुरु
दसऱ्या निमित्त खरेदीसाठी विविध ऑफर्स, ग्राहकांनी लाभ घ्यावा : संचालक प्रणय तेली यांचे आवाहन
मालवण | कुणाल मांजरेकर
मागील 22 वर्षांपासून कुडाळ येथून संपूर्ण जिल्ह्यात संगणकीय साहित्य विक्रीची सेवा देणाऱ्या नोबल कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिसची शाखा मालवण शहरात वाघ पिंपळ नजिक सिताई कॉम्प्लेक्स मध्ये सुरु करण्यात आली आहे. नामांकित कंपनींचे लॅपटॉप, डेस्टटॉप, गेमिंग लॅपटॉप सह संगणकाला आवश्यक असणारे सर्व साहित्य याठिकाणी माफक दरात उपलब्ध होणार असून ग्राहकांसाठी बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती नोबल कॉम्पुटरचे संचालक प्रणय तेली यांनी दिली. रविवारी या शाखेचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी ग्राहकांनी याठिकाणी गर्दी केली होती. दरम्यान, दसऱ्या निमित्ताने खरेदीसाठी विविध ऑफर्स उपलब्ध असून झिरो डाउन पेमेंट वर देखील खरेदीची संधी देण्यात येत आहे, तरी ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. तेली यांनी केले आहे.
कुडाळ शहरात हिंदू कॉलनी येथून मागील 22 वर्षे प्रणय तेली आणि सौ. सई तेली यांच्या वतीने नोबल कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिसच्या माध्यमातून संगणक आणि संगणक साहित्याची विक्री सेवा दिली जात आहे. त्याचप्रमाणे नोबल कॉम्प्युटर एज्युकेशन प्रा. लिमि. च्या वतीने 2008 पासून जिल्ह्यातील 75 केंद्रांवरून स्थानिक संगणक प्रशिक्षण केंद्रांच्या मदतीने जिल्ह्यात एमएस- सीआयटी कोर्स चालवला जात असून 2003 पासून “नोबल कॉम्प्युटर एज्युकेशन” हे एमकेसीएलचे अधिकृत केंद्र चालवून आजपर्यंत 10 हजार हून अधिक विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देण्यात आले आहे.
बड्या शासकीय, निमशासकीय संस्थांचे एकमेव खरेदी दालन
नोबल कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस हे जिल्ह्यातील एकमेव शासनमान्य ई मार्केटप्लेस असून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा निवडणूक कार्यालय, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समित्या, ग्रामपंचायती, 10 हून अधिक महाविद्यालये, 20 हून अधिक हायस्कुल, 100 हून अधिक प्राथमिक शाळा, रोटरी क्लब, 10 हून अधिक लायब्ररी, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, आयआरबी सिंधुदुर्ग विमानतळ, जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायती, पोलीस स्थानके यांच्यासह 5 हजार हून अधिक ग्राहक याठिकाणचे नियमित ग्राहक असल्याचे प्रणय तेली यांनी म्हटले आहे.
नामांकित कंपन्यांचे वैविध्यपूर्ण दालन
नोबल कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस हे नामांकित कंपन्यांचे अधिकृत वितरक आहेत. DELL, HP, LENOVO, ASUS सारख्या कंपन्यांचे लॅपटॉप, डेस्टटॉप, बिझनेस अँड होम पीसी, पहिली ते दहावीची शैक्षणिक सॉफ्टवेअर, टॅबलेट, प्रोजेक्टर, स्मार्ट टीव्ही, झेरॉक्स मशीन, लॅमिनेशम मशीन, एअर प्युरिफायर, बायडींग मशीन, काउंटिंग मशीन, पेपर कटिंग मशीन, सीसीटीव्ही यंत्रणा याठिकाणी उपलब्ध आहेत. याशिवाय प्रिंटर, स्कॅनर, युपीएस, फॅक्स, कॉपियर, ऑल इन वन मल्टिफंकशन मशीन, प्रिंट सर्व्हर अँड नेटवर्क सॉफ्टवेअर, लार्ज फॉरमॅट प्रिंटर्स आदी वस्तू याठिकाणी उपलब्ध आहेत.
… म्हणून मालवणमध्ये सेवा : प्रणय तेली
कुडाळ शहर आपली जन्मभूमी असली तरी मालवण शहरात शासकीय तंत्रानिकेतन मध्ये आपलं शिक्षण झाल्याने मालवण ही आपण शैक्षणिक भूमी समजतो. मालवण मधील अनेक ग्राहक संगणक आणि साहित्य खरेदीसाठी कुडाळ मध्ये नोबल कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस मध्ये येतात. त्यामध्ये त्यांचा वेळ वाया जातो. त्यामुळे मालवण वासियांसाठी हे दालन आपण याठिकाणी सुरु केले आहे. सर्व प्रकारचे संगणक आणि साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होणारे हे मालवण मधील पहिलेच दालन आहे. याठिकाणी ग्राहकांसाठी बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध असून झिरो डाऊन पेमेंट देखील ग्राहकांना उपलब्ध आहे. त्याशिवाय क्रेडिट कार्ड, पाईन लॅब मशीन द्वारे विविध बँकेंच्या ऑफर्स याठिकाणी उपलब्ध आहेत. दसऱ्या निमित्ताने विविध ऑफर्स ठेवण्यात आल्या असून रविवार वगळता दररोज सकाळी 9.30 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत वाघ पिंपळ नजिक सिताई कॉम्प्लेक्स मध्ये आमची सेवा सुरु राहणार आहे, तरी ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 9422435095, 7058190614 किंवा 9403593940 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रणय तेली आणि सौ. सई तेली यांनी यावेळी केले आहे.