नवरात्रौत्सवा निमित्त मालवणात बच्चे कंपनी आणि महिला वर्गाला धम्माल पर्वणी !

शिल्पा खोत आणि यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीने फॅन्सी ड्रेस, फनी गेम्स, खेळ पैठणीचा कार्यक्रमांचे आयोजन

मालवण | कुणाल मांजरेकर

नवरात्रौत्सवा निमित्ताने मालवण धुरीवाडा येथे सौ. शिल्पा खोत आणि माजी नगरसेवक यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीने महिलांसाठी गरबा आयोजित करण्यात आला आहे. याचेच औचित्य साधून याठिकाणी शनिवार ते सोमवार पर्यंत फॅन्सी ड्रेस आणि महिलांसाठी “खेळ पैठणीचा” कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याठिकाणी विजेत्यांवर आकर्षक बक्षीसांची उधळण करण्यात येणार आहे.

शनिवारी रात्री 9 वाजता लहान मुलांची वेशभूषा स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा 6 वर्षांपर्यंतचा वयोगट, 7 ते 12 वर्षांपर्यंतचा वयोगट आणि 13 ते 16 वर्षे वयोगटात होणार आहे. तर रविवारी महिला खुला गटासाठी वेषभूषा स्पर्धा होणार आहे. सोमवारी महिलांसाठी खेळ पैठणीचा आणि लहान मुलांसाठी फनीगेम होणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. तरी नावनोंदणीसाठी सौ. शिल्पा खोत 9326477706 किंवा सौ. सायली कांबळी 9764397139 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3602

Leave a Reply

error: Content is protected !!