धक्कादायक : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन

पनवेल : मराठा आरक्षणासाठी झटणारे शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले आहे. ते ५२ वर्षांचे होते. पहाटे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. उपचारदरम्यान विनायक मेटे यांची प्राणज्योत मालवली.

विनायक मेटे हे आपल्या कार्यकर्त्यांसह रात्री बीडहून मुंबईला रवाना झाले होते. मुंबईला जात असताना त्यांच्या गाडीला मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाला. या अपघातात मेटे हे जखमी झाले होते. हा अपघात इतका भीषण होता की, फॉच्युनर गाडीचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे. नेमका हा अपघात कशामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही. या अपघातात मेटे जखमी झाले. त्यांना पनवेलमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातील त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात होते. पण उपचारदरम्यान सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ आज पहाटे साडेपाच वाजता हा अपघात झाला. त्यांच्यावर पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात क्रिटीकेयर युनिटमध्ये त्यांना तातडीने दाखल केले होते. अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र गाडीत काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. वाहनात तांत्रिक बिघाड झाल्याने गाडी डोंराच्या कपारीला धडकल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!