ऐतिहासिक नारळी पौर्णिमेनिमित्त उद्या मालवण व्यापारी संघाचे भरगच्च उपक्रम
आट्या पाट्या खेळ, कबड्डी सामने, व्यापाऱ्यांच्या गुणवंत मुलांसह उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यापारी बांधवांचा सत्कार
सायंकाळी ३.४५ वाजता हनुमान मंदिरातून वाजत गाजत मानाचा श्रीफळ सागराला अर्पण करणार
कुणाल मांजरेकर
मालवण : मालवण येथील ऐतिहासिक नारळी पौर्णिमेनिमित्ताने मालवण व्यापारी संघाच्या वतीने गुरुवारी ११ ऑगस्टला विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
दुपारी ३ वा. श्रीदेव हनुमान मंदिरात सर्वकल्याणी साकडे ३.०५ वा. सवाद्य मिरवणूकीला आरंभ, ३.१० वा. श्री गणपती मुरलीधर देवालयात आगमन व साकडे, ३.२५ वा. सवाद्य मिरवणूकीचे बंदर जेटी येथे आगमन, ३.३० वा. व्यापारी संघाचे अध्यक्षांचे हस्ते मालवणवासीयांच्या मानाच्या प्रतिकात्मक सुवर्ण श्रीफळाचे व सागरराजाचे पुजन, ३.४५ नंतर किल्ले सिंधुदुर्ग येथील प्रथम मानाचा श्रीफळ अर्पण सोहळा व त्यानंतर मालवणवासीयां कडून अन्नदात्या रत्नाकराला श्रीफळ अर्पणास प्रारंभ करण्यात येणार आहे.
सायंकाळी ४ वा. आट्यापाट्या या मान्यताप्राप्त खेळाचा बॅ.नाथ पै सेवांगणच्या संयुक्त विद्यमाने प्रदर्शनीय सामना होणार असून सायं. ५ वा. पासून निमंत्रितांच्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन व सामने होणार आहेत. सायंकाळी ५.३० ते ६.३० वा. दैवज्ञ भवन येथे व्यापारी बांधवांच्या गुणवंत मुलांचा गुणगौरव व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यापारी सभासदांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून शुक्रवार दि. १२ ऑगस्टला सायंकाळी ४ वाजता
मामा वरेरकर नाट्यगृह येथे प्लास्टीक मुक्ती अभियाना बाबत मालवण नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमांचा मालवणवासीयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मालवण व्यापारी संघाच्या वतीने करण्यात आले आहे.