वायरी बांध येथील नारळ लढवण्याच्या स्पर्धेत दुर्गेश धुरी विजेता

हरी खोबरेकर मित्रमंडळ व डी.सी.सी. वायरी यांच्या वतीने करण्यात आले आयोजन ; १३६ स्पर्धकांचा सहभाग

मालवण | कुणाल मांजरेकर

शिवसेना तालुकाप्रमुख, माजी जि. प. सदस्य हरी खोबरेकर मित्रमंडळ व डी.सी.सी. वायरी यांच्या वतीने नवीन दत्त मंदिर वायरी बांध येथे आयोजित नारळ लढविणे स्पर्धेत दुर्गेश धुरी यांनी विजेतेपद मिळवले. या स्पर्धेत पंकज केळुसकर उपविजेते ठरले तर आकाश तळगावकर आणि लक्ष्मण मोंडकर यांनी अनुक्रमे तृतीय आणि चतुर्थ क्रमांक मिळवला. विजेत्या, उपविजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे ५,००० रुपये व चषक आणि ३,००० रुपये व चषक तर तृतीय आणि चतुर्थ स्पर्धकांना प्रत्येकी १००० व चषक देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेचे उदघाटन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत १३६ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यावेळी मातृत्व फाउंडेशन अध्यक्ष संतोष लुडबे, मच्छिमार नेते दिलीप घारे, भगवान लुडबे, नाना नाईक, निलेश पणदूरकर, राजू मेस्री, संमेश परब, बाबी जोगी, गणेश कुडाळकर, प्रवीण लुडबे, वैभव खोबरेकर, वासुदेव चव्हाण, नाथा चव्हाण, आप्पा जोशी, प्रसाद चव्हाण व अन्य उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!