महावितरणच्या ८५ % च्या परिपत्रकाद्वारे कमी केलेले कंत्राटी कामगार पुन्हा महावितरणच्या सेवेत

जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांच्याहस्ते नियुक्तीपत्र ; कुडाळ मध्ये बैठक संपन्न

कुडाळ | कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही कंत्राटी कामगारांना महावितरण कंपनीच्या ८५% च्या परीपत्रका मुळे कमी करण्यात आले होते. त्या कमी केलेल्या कंत्राटी कामगारांना पुन्हा नव्याने ‘कंत्राटी कामगार’ म्हणून नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. कंत्राटी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी या कंत्राटी कामगारांनी सिंधुदुर्ग वीज कंत्राटी कामगार संघटना सिंधुदुर्गचे आभार मानले.

सिंधुदुर्ग वीज कंत्राटी कामगार संघटना सिंधुदुर्गची मासिक सभा कुडाळ एमआयडीसी विश्रामगृहात संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली. या सभेला सिंधुदुर्ग वीज कंत्राटी कामगार संघटनेचे जिल्हा सरचिटणीस संदीप बांदेकर, कोषाध्यक्ष मोहन गावडे, जिल्हा उपाध्यक्ष सर्वेश राऊळ, जिल्हा उपाध्यक्ष रुपेश पवार, वेंगुर्ला प्रतिनिधी योगराज यादव, दोडामार्ग प्रतिनिधी दर्शन देसाई, ओरोस प्रतिनिधी विनोद बोभाटे, चेतन सावंत, रघुनाथ जाधव, सल्लागार जयेंद्र कुंभार, गणेश राऊळ, संदेश गावडे, अजित पालकर, दीपक परब, गुणाजी आईर, सचिन नाईक, सदानंद पवार, रितेश जाधव, दिनेश करीलगेकर विशाल सुकळवाडकर, रवींद्र परब, दीपक वायंगणकर, दीपक निवळे, रुपेश जाधव, गणेश परब अंकुश चव्हाण, हरेश लांबोरे गणेश गावकर, संदेश वरावडेकर विनय येरम, वैभव ठाकूर, महादेव नाईक, देऊ जाधव, दिनेश राऊळ, सायली सांगोलेकर, योगेश म्हसकर, श्रीराम कुंभार, प्रसाद मेस्त्री, कृष्णा पवार, स्वप्निल तावडे, दाजी कुंभार, विनायक गावडे, योगेश धरणे, अजित पाटयेकर यांसह कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महावितरण कंपनीमध्ये ज्या काही कोर्ट केस कंत्राटी कामगारांच्या संदर्भात आहेत. व नवीन कोर्ट केस उपस्थित झाल्या आहेत, त्यावर सविस्तर चर्चा होऊन एक योग्य असा महत्वाकांक्षी निर्णय या सर्व कोर्ट केस संदर्भात घेण्यात आला. तो आपल्या साक्षीने लवकरात लवकर जाहीर करू, असे अशोक सावंत यांनी सांगितले.
महावितरण कंपनीच्या ८५%च्या परीपत्रका मुळे राज्यातील कंत्राटी कामगार कमी झालेले आहेत. या संदर्भात रत्नागिरी झोनचे चीफ इंजिनिअर श्री. भटकर यांच्याशी सिंधुदुर्ग वीज कंत्राटी कामगार संघटना सिंधुदुर्गचे अध्यक्ष अशोक सावंत यांनी मोबाईल फोनव्दारे चर्चा केली. हे प्रकरण मुंबई हेड ऑफिसकडे प्रलंबित आहे. त्यावर निर्णय घेत संपूर्ण राज्यभर ९५% नव्हे तर १००% कंत्राटी कामगार भरतीसाठी सिंधुदुर्ग वीज कंत्राटी कामगार संघटना सिंधुदुर्ग प्रयत्न करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. कामगारांचा सर्वात महत्त्वाचा व भविष्याचा एकमेव मुद्दा व विषय ठेकेदार विरहित शाश्वत रोजगार व पगारवाढ यावर जवळपास अर्धा तास चर्चा होऊन पुढील रणनीती आखली गेली. ही लढाई खुप जवळ आलेली आहे. शासनाकडून फक्त तोंडी आश्वासन नको तर कृती हवी, यासाठी सिंधुदुर्ग वीज कंत्राटी कामगार संघटना बांधील आहे. त्यामुळे येणारा काळ हा नक्कीच कंत्राटी कामगारांच्या भवितव्याचा काळ असेल, असा विश्वास अशोक सावंत यांनी व्यक्त केला.

नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांनी सिंधुदुर्ग वीज कंत्राटी कामगार संघटनेच्या पदाधिकारी नियुक्त्या जाहीर केल्या. यामध्ये जिल्हा सरचिटणीस संदीप बांदेकर, जिल्हा उपाध्यक्षपदी सर्वेश राऊळ, जिल्हा उपाध्यक्ष रुपेश पवार तसेच कोषाध्यक्ष श्री. मोहन गावडे यांना संघटनेच्या वतीने गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा संघटक पदी आनंद लाड यांची नियुक्ती करण्यात आली. कंत्राटी कामगारांनी एकसंघ राहून एकजुट ठेवावी, असे आवाहन अशोक सावंत यांनी यावेळी केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!