मालवण नगरपालिकेच्या २० पैकी १० जागा महिलांसाठी आरक्षित
प्रभाग ३ अ अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी आरक्षित
मालवण : मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी ओबीसी आरक्षणासह प्रभाग निहाय आरक्षण सोडत गुरुवारी येथील मामा वरेरकर नाट्यगृहात काढण्यात आली. यावेळी पालिकेच्या २० पैकी १० जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. तर प्रभाग ३ अ ही जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाली आहे.
यावेळी प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार अजय पाटणे, पालिका मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कु. रसल बस्त्याव फर्नांडिस या छोट्या मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली.
पालिकेचे प्रभाग निहाय आरक्षण
प्रभाग – १ (अ) – सर्वसाधारण, १ (ब) ओबीसी महिला, प्रभाग – २ (अ) – सर्वसाधारण, २( ब) – सर्वसाधारण महिला, प्रभाग – ३ (अ)- अनुसूचित जाती, ३ (ब) – सर्वसाधारण महिला, प्रभाग – ४ (अ)- सर्वसाधारण, ४ (ब)- सर्वसाधारण महिला, प्रभाग – ५ (अ)- सर्वसाधारण, ५ (ब)- सर्वसाधारण महिला, प्रभाग – ६ (अ)- नागरिकांचा मागास प्रवर्ग, ६ (ब)- सर्वसाधारण महिला, प्रभाग – ७ (अ) – नागरिकांचा मागास प्रवर्ग, ७ (ब)- सर्वसाधारण महिला, प्रभाग ८ (अ)- सर्वसाधारण, ८ (ब)- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग ९ (अ)- सर्वसाधारण, ९ (ब)- सर्वसाधारण महिला, प्रभाग १० (अ)- सर्वसाधारण, १० (ब)- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला