मालवण तालुक्यात जि. प. चे तीन मतदार संघ खुले ; राजकिय पक्षांची डोकेदुखी वाढणार
दोन विद्यमान सदस्यांना फटका तर खुल्या प्रवर्गामुळे काही सदस्यांसमोर तिकिटासाठी कडवे आव्हान
मालवण | कुणाल मांजरेकर
पंचायत समिती पाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण प्रक्रिया गुरुवारी ओरोस येथे घेण्यात आली. यामध्ये मालवण तालुक्यातील ७ पैकी देवबाग, मसुरे आणि आडवली मालडी हे तीन मतदार संघ खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने राजकिय पक्षांची डोकेदुखी वाढणार आहे.
जिल्हा परिषदेसाठी आरक्षण सोडत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यामध्ये देवबाग, मसुरे आणि आडवली हे तीन मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत. सुकळवाड, पेंडूर आणि गोळवण मतदार सर्वसाधारण पहिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला. तर आचरा मतदारसंघ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला साठी आरक्षित झाला आहे.
या आरक्षणात आचरा येथून जेरॉन फर्नांडिस, पेंडूर मध्ये संतोष साटविलकर याना फटका बसला आहे. तर काही जागा खुल्या झाल्याने विद्यमान सदस्यांना उमेदवारीसाठी आव्हान निर्माण झाले आहे.