मालवणचे सुपुत्र, प्रख्यात वृत्तनिवेदक ऋषी देसाई कोकण रत्न पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित

कोकण युवा प्रतिष्ठानच्या वतीने कोकणातल्या प्रतिभावंताचा गौरव

मालवण : मालवणचे सुपुत्र तथा लोकशाही न्यूजचे वृत्तनिवेदक ऋषी देसाई यांना कोकण युवा प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणाऱ्या कोकण रत्न पत्रकारिता या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ऋषी देसाई यांच्यासह देवाक काळजी या गाण्याचे संगीतकार विजय गवंडे यांनाही यावेळी गौरवण्यात आले. कोकणातल्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन डोंबिवली येथे करण्यात आले होते.

कोकण युवा प्रतिष्ठान तर्फे कोकणातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना ‘ कोकण रत्न ‘ पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी डॉ. महेंद्र कामत यांना कोकण भूषण पुरस्कार, विजय गवंडे यांना कोकण कलारत्न पुरस्कार, ऋषी देसाई यांना कोकण रत्न पत्रकारिता पुरस्कार, दीपक नागवेकर यांना कोकण शिक्षणरत्न पुरस्कार, गीतेश शिंदे यांना कोकण साहित्यरत्न पुरस्कार, संतोष कासले यांना कोकण समाजरत्न पुरस्कार, प्रशांत पाटणकर यांना कोकण क्रीडारत्न पुरस्कार, सत्यवान आगटे आणि योगेश गोठणकर यांना कोकण उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कोकण रत्न पत्रकारिता पुरस्काराने यावेळी लोकशाही न्यूजचे वृत्तनिवेदक ऋषी देसाई यांना राजापूर लांजा तालुका नागरीक संघ अध्यक्ष श्री सुभाष लाड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ऋषी देसाई यांचे लोकशाही न्यूजवर ‘सीएम मला तुमच्याशी बोलायचे आहे’ आणि ऋषी देसाईचा फटका’ हे महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!