दत्ता सामंत यांचं नियोजन ; भव्य मोटरसायकल रॅलीने दादांचं होणार मालवणात स्वागत !

कोळंब पुलाकडून निघणार रॅली ; देवबाग पं. स. मतदार संघातील भाजपचे कार्यकर्ते होणार सहभागी

कुणाल मांजरेकर
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर कोकणचे सुपुत्र, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे प्रथमच मालवणात आगमन होत आहे. यानिमित्त ठिकठिकाणी राणे साहेबांच्या स्वागताचे नियोजन करण्यात आले आहे. भाजपा नेते दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली कोळंब सागरी महामार्ग येथून नारायण राणेंचे भव्य मोटरसायकल रॅलीने शहरात स्वागत करण्यात येणार आहे. २०० मोटरसायकली या रॅलीत सहभागी होणार आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील मोदी सरकारचा मागील महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. या विस्तारात कोकणचे सुपूत्र नारायण राणेंची कॅबिनेट मंत्री पदी वर्णी लागली आहे. यानंतर ना. राणे प्रथमच जिल्ह्यात दाखल झाले असून राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली जन आशीर्वाद यात्रा जिल्ह्यात सुरू आहे. ही यात्रा आज दुपारी ३ वाजता मालवण मध्ये दाखल होत आहे. यानिमित्ताने दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली देवबाग पंचायत समिती मतदार संघाच्या वतीने कोळंब पुला कडून भव्य मोटर सायकल रॅलीने राणेसाहेबांचे स्वागत करण्यात येणार आहे. २०० मोटरसायकल या रॅलीत सहभागी होणार आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!