विद्यार्थ्यानी ध्येय निश्चित करून वाटचाल करा, आर्थिक परिस्थितीमुळे कोणाचे शिक्षण थांबणार नाही याची जबाबदारी आमची !

हिंद मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विशाल परब यांची वैभववाडी येथे ग्वाही

वैभववाडीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न ; सहाशे विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप

वैभववाडी : हिंद मराठा महासंघ समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या सदैव पाठीशी आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने ध्येय निश्चित करून वाटचाल केली पाहिजे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणाचे शिक्षण थांबणार नाही याची जबाबदारी आम्हा मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची आहे. सर्वांनी चांगले शिक्षण घेऊन देशाचे नाव उज्वल करावे, असे प्रतिपादन हिंद मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विशाल परब यांनी वैभववाडी येथे बोलताना केले.

वैभववाडी येथील सुवर्णा मंगल कार्यालयात हिंद मराठा महासंघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार, गुणगौरव सोहळा तसेच विद्यार्थ्यांना दप्तर वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांनी मोठी गर्दी केली होती. दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मराठा समाजातील 600 विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला महासंघाचे सल्लागार अशोक सावंत, माजी वित्त बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, नगराध्यक्ष नेहा माईणकर, माजी नगराध्यक्ष रोहन रावराणे, दादा साईल, प्राची तावडे, राजू पवार, संजय भोवड, आबा रावराणे, प्रसाद गावडे, विठ्ठल सावंत व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशाल परब यांनी सर्व विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. प्रत्येकाने खूप शिकले पाहिजे. मोठे झाले पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात वर्चस्व गाजवलं पाहिजे असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. जयेंद्र रावराणे, अशोक सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. वैभववाडी तालुका हिंद मराठा महासंघाच्या अध्यक्षपदी रोहन रावराणे यांची नियुक्ती या सभेत करण्यात आली. विशाल परब यांनी त्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव व पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!