एक दिवस बळीराजासाठी … ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम !
किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग यांच्या हडीतील बांधावर गिरवले शेतीचे धडे
मालवण | कुणाल मांजरेकर
भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे मुलांना शालेय जीवनातच शेती विषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने ओझर विद्यामंदिर कांदळगाव च्या विद्यार्थ्यांनी हडी येथे शेतीचे धडे गिरवले. किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष महेश सारंग यांच्या हडी येथील शेतीच्या बांधावर हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी देखील या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.
अलीकडे मुलांमध्ये शेती विषयी आवड कमी कमी होत चालली आहे. त्यामुळे मुलांना शेतीचे महत्व पटावे, त्यांच्या मध्ये शेती विषयीआवड निर्माण व्हावी आणि बळीराजाला आपणही खारीचा वाटा उचलत मदत करावी, या हेतूने ओझर विद्यामंदिर, कांदळगावचे शिक्षक व विद्यार्थी यांनी किसान मोर्चा मालवणचे अध्यक्ष महेश सारंग यांच्या हडी येथील बांधावर एक काडी भात लावणीचा अनुभव घेत शेतीचा आनंद घेतला. यावेळी किसान मोर्चा जिल्हाधक्ष उमेश सावंत, ओझर विद्यामंदिरचे चेअरमन किशोर नरे, किसान मोर्चा मालवण उपाध्यक्ष प्रसाद भोजने, सल्लागार हरिभाऊ केळुसकर, संजय मळेकर, कु. समृद्धी मळेकर, हडी ग्रामस्थ मया मांजरेकर, सौ. अंकिता लाड, सौ. अनिता हडकर, सौ. मंगला हडकर, ओझर विद्यामंदिरचे शिक्षक श्री. जाधव सर, श्री. राणे सर, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.