शिंदे- फडणवीस सरकारचे वाभवे – वैभववाडी नगरपंचायतीला मोठे गिफ्ट ; विकास कामांसाठी ३.८३ कोटी मंजूर

आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाला भरघोस निधी ; भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांची माहिती

वैभववाडी : राज्यात स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने वाभवे – वैभववाडी नगरपंचायतीला मोठे गिफ्ट दिले आहे. आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून नगरपंचायत कार्यक्षेत्रामधील विकास कामांसाठी ३ कोटी ८३ लाखांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती वैभववाडी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहरात लवकरच नगरपंचायत मालकीचे नाना नानी पार्क व हक्काची इमारत बांधण्यात येणार आहे. अग्निशमनचे वाहन व सेल्फी पॉइंट यासारख्या सुविधा देखील आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून लवकरच मार्गी लागतील, असे नासीर काझी यांनी सांगितले.

ही पत्रकार परिषद वैभववाडी भाजपा कार्यालय या ठिकाणी पार पडली. यावेळी नगराध्यक्ष नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, माजी सभापती अरविंद रावराणे, न.पं. बांधकाम सभापती विवेक रावराणे, नगरसेवक रोहन रावराणे, महिला तालुका अध्यक्ष प्राची तावडे, सुनील भोगले, माजी सभापती शुभांगी पवार, नगरसेविका सुंदरा निकम, नगरसेविका संगीता चव्हाण, नगरसेविका यामिनी वळवी आदी उपस्थित होत्या. यावेळी काझी म्हणाले, जानेवारी २०२२ मध्ये नगरपंचायत निवडणूक पार पडली. यावेळी प्रचारादरम्यान आमदार नितेश राणे यांनी प्रत्येक वार्डातल्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या होत्या. शहरवासीयांना नागरी सुविधा पुरवण्याची आमची जबाबदारी आहे. त्या पुरविण्याचे अभिवचन आ. नितेश राणे यांनी शहरवासीयांना दिले होते. त्याची पूर्तता आता करण्यात येत आहे. नगरोत्थान योजनेतून १ कोटी ३२ लाख इतका निधी मंजूर झाला आहे. तर शिंदे व भाजपा सरकार स्थापन झाल्यानंतर तातडीने नागरी सेवा व सुविधा पुरविणे या हेडमधून २ कोटी ५१ लाख निधी प्राप्त झाला आहे. नगरोत्थान योजनेमधून मंजूर कामे पुढीलप्रमाणे- वाभवे वैभववाडी वार्ड क्रमांक ६ सडूरे ते तालुका शाळा नं. १ फुटपाथ बांधणे – १२ लाख, प्रभाग क्रमांक १३ कोंडवाडी रस्ता डांबरीकरण करणे – ३० लाख, कृषी वैद्यकीय दवाखाना स्मशानभूमी नूतनीकरण करणे- ३५ लाख, वार्ड क्रमांक १२ नावळे सडूरे रस्ता सज्जनकाका घर ते बरगे घर रस्ता मोरी बांधणे – १५ लाख, स्ट्रीट लाईट बसविणे गरजेनुसार – १० लाख, वाभवे वैभववाडी नगरपंचायत येथील सुलभ शौचालय दुरुस्ती करणे – १० लाख, वैभववाडी तहसील कार्यालयाकडे जाणारा रस्ता डांबरीकर करणे व मोरी बांधणे – २० लाख यांचा समावेश आहे.

भाजपा व शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर नागरी सेवा व सुविधा पुरविणे या योजनेतून मंजूर कामे पुढीलप्रमाणे – वाभवे वैभववाडी वार्ड क्रमांक ९ व वार्ड क्रमांक १० मध्ये फोंडा मुख्य रस्ता ते शांती नदी पर्यंत उर्वरित गटार बांधणे – १५ लाख, वार्ड क्रमांक १ मधील गणपती विसर्जन घाट सुशोभीकरण करणे- २० लाख, वार्ड क्रमांक ८ मधील गटार बांधणे- १० लाख, वार्ड क्रमांक २ मधील फोंडा मुख्य रस्ता ते माईनकरवाडी मध्ये डांबरीकरण करणे- १५ लाख, वार्ड क्रमांक ७ वार्ड क्रमांक ८ मध्ये कुबडे घर ते दिलीप रावराणे घर मधील काँक्रीट रस्ता करणे -१० लाख, वार्ड क्रमांक १५ मध्ये फोंडा मुख्य रस्ता ते मांजरेकरवाडी पर्यंत रस्ता करणे – १० लाख, वार्ड क्रमांक ११ मध्ये नगरपंचायत ते परब सर घरापर्यंत रस्ता रुंदीकरण व सुशोभीकरण करणे – २० लाख, वैभववाडी नगरपंचायत हद्दीमधील सुख नदीवर बंधारा बांधणे – ५० लाख, वैभववाडी वार्ड क्रमांक ६ व वार्ड क्रमांक २ मध्ये दत्त मंदिर ते सुख नदीपर्यंत काँक्रीट गटार बांधणे व फूटपाथ बांधणे – ५० लाख, वार्ड क्रमांक ८ मध्ये फोंडा उंबर्डे मुख्य रस्ता ते शांती नदी पर्यंत बाबू राणे घर काँक्रीट गटार बांधणे – २० लाख, वार्ड क्रमांक ५ मधील काँक्रीट रस्ता दुरुस्त करणे व वैभववाडी नगरपंचायत वैभववाडी हद्दीत आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही बसविणे – १५ लाख, वैभववाडी वार्ड क्रमांक १७ मध्ये स्वामी समर्थ मठ ते इस्वलकर घर रस्ता डांबरीकरण करणे- १६ लाख या कामांचा समावेश आहे.

लवकरच नगरपंचायतच्या २० गुंठे प्लॉट मध्ये नाना नानी पार्क व नगरपंचायत मालकीची इमारत ही देखील कामे मार्गी लागतील. गणेश चतुर्थी पुर्वी शहरात सेल्फी पॉइंट तयार करण्यात येणार आहे. शहरात ड्रेनेजचा गंभीर विषय आहे. त्याचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. लवकरच ही समस्या ही मार्गी लागेल. त्याचबरोबर नगरपंचायतच्या मालकीचे अग्निशमन वाहन यासाठी ५५ लाख निधी मंजूर झाला आहे. भाजपा व नगरपंचायत शहरवासीयांना सेवा देण्यासाठी सदैव तत्पर आहे. आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या शहराला विकसित करण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील, असे नासीर काझी यांनी सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!