“देऊ शब्द तो पूर्ण करू”… निलेश राणेंकडून पुन्हा प्रचिती !!

स्व. सुधीर कलिंगण यांच्या मुलाच्या मोठ्या भावाची भूमिका चोख निभावली ; आर्थिक अडचणीतून काढला मार्ग

कुणाल मांजरेकर | सिंधुदुर्ग

भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी “देऊ शब्द तो पूर्ण करू” या शब्दाची प्रचिती आणून दिली आहे. मागील आठवड्यात निलेश राणे यांनी लोकराजा स्व. सुधीर कलिंगण यांच्या कुटुंबियांची सदिच्छा भेट घेतली होती. त्यावेळी कलिंगण यांच्या मुलाला धीर देताना त्यांच्या प्रत्येक प्रसंगात मोठ्या भावा प्रमाणे आपण पाठीशी राहू, हा शब्द त्यांनी दिला होता. हा शब्द खरा ठरवत कलिंगण कुटुंबियांचा अडकून असलेला आर्थिक प्रश्न निलेश राणे यांनी तात्काळ मार्गी लावून दिला आहे. याबद्दल स्व. सुधीर कलिंगण यांचा मुलगा सिद्धेश कलिंगण याने निलेश राणेंच्या अंधेरी येथील कार्यालयात भेट घेत त्यांचे आभार मानले.

कोकण म्हटलं की दशावतार आलं आणि दशावतार म्हटलं की सर्वांच्या मुखात पहिलं नाव येतं ते कै. नटसम्राट बाबी कलिंगणयांचं ! कोकण सुपूत्र, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि स्व. बाबी कलिंगण यांच्या कुटुंबाचे खुप जवळचे सबंध आहेत. वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून माजी खासदार निलेश राणे यांनी हे पारंपार चालत आलेले संबंध जपून ठेवले आहेत. कलिंगण कुटुंबाचा कुठलाही प्रसंग असो किंवा आर्थिक मदत यासाठी राणे कुटुंबांचा नेहमीच हात वर असतो, हे परत एकदा सिद्ध झाले आहे. दशावतारातील लोकराजा म्हणून प्रसिद्ध असलेले कोकण रत्न कै. सुधीर कलिंगण यांच्या कुटुंबियांची त्यांच्या कुडाळ- नेरूर येथील निवासस्थानी मागील आठवड्यात निलेश राणे यांनी भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी सिद्धेश कलिंगण व पंकज कलिंगण यांना तुम्ही मला कधीही आवाज द्या, मी मोठा भाऊ म्हणून सदैव तुमच्या पाठीशी उभा राहीन. असा शब्द देत त्यांच्या कुटुंबीयांचा अडकून असलेला आर्थीक अडचणीचा विषय लवकरच सोडवण्याचा शब्द दिला होता. हा शब्द पूर्ण करून या कुटुंबाला आर्थिक स्वरूपात खुप मोठा आधार मिळवून देत पुन्हा एकदा युवा पिढीच्या मनातील राजा आणि जनतेच्या कामाचा राजा माणूस म्हणून निलेश राणे यांनी प्रचिती मिळवली आहे. कै. सुधिर कलिंगण याचे जेष्ठ पुत्र सिध्देश कलिंगण यांनी मुंबई सिंधुदुर्ग भवन येथे निलेश राणे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!