शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलं वैभव नाईकांचं कौतुक

तुमच्या भूमिकेचा महाराष्ट्राला अभिमान

कुणाल मांजरेकर | सिंधुदुर्ग

राज्यातील राजकिय घडामोडीत शिवसेनेच्या अनेक निष्ठावंत (?) आमदार, पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेची साथ सोडत बंडखोर शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. सिंधुदुर्गातही आमदार दीपक केसरकर, पालकमंत्री उदय सामंत बंडखोर गटात सहभागी झाले. मात्र कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी शिवसेनेच्या भगव्याशी प्रामाणिक रहात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ दिली. याबद्दल उद्धव ठाकरेंनी एक पत्र पाठवत आ. वैभव नाईक यांचे कौतुक केले आहे.

शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे हेच आपले सर्वस्व आहे. निष्ठा व अस्मितेची महती हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनीच आपल्याला शिकवली. आईच्या दुधाशी बेईमानी करु नका हा त्यांचा निष्ठेबाबतचा मंत्र आजही सगळ्यांना सन्माननीय. शिवसेनेचे आमदार म्हणून आपण त्या निष्ठेचे पालन केलेत व वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक असल्याचे दाखवून दिलेत. कोणत्याही धमक्या वा प्रलोभनाला बळी न पडता आपण निष्ठेने शिवसेनेसोबत राहिलात, आपल्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला व शिवसेनेस बळ मिळाले. आई जगदंबा आपणांस निरोगी उदंड आयुष्य देवो, असे पत्र उद्धव ठाकरे यांनी वैभव नाईक यांना पाठवले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!