देवेंद्र फडणवीस – निलेश राणे यांची गळाभेट !
कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्ग : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा मुख्यमंत्री पदाचे दावेदार देवेंद्र फडणवीस यांची भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी खासदार निलेश राणे यांनी गुरुवारी भेट घेतली. यावेळी फडणवीस यांना निलेश राणे यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी निलेश राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील गळाभेट चर्चेचा विषय ठरला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात निलेश राणे यांनी सातत्याने आवाज उठवला होता. अखेर ठाकरेंवर त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर भावी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिले जात असून या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आ. कालिदास कोळंबकर, भाजपचे युवा नेते तथा मराठा महासंघाचे सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष विशाल परब आदी उपस्थित होते.