मालवणात संजय गांधी योजनेच्या नवीन ९५ प्रकरणांना मंजुरी

समिती अध्यक्ष मंदार केणी यांची माहिती ; “या” दोन प्रवर्गाची तीन महिन्यांची प्रलंबित पेन्शन जमा

कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या बुधवारी झालेल्या बैठकीत ९५ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे. मालवण तहसील कार्यालयात ही बैठक घेण्यात आली.

या बैठकीस तहसीलदार अजय पाटणे, समिती अध्यक्ष मंदार केणी, सुनील पाताडे, गणेश कुडाळकर, भाऊ चव्हाण, प्रमोद कांडरकर, महेंद्र मांजरेकर, अनुष्का गावकर आदी सदस्य उपस्थित होते. संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन गेले तीन महिने प्रलंबित होती. यातील जनरल कॅटेगरी, अनुसूचित कॅटेगिरीची पेन्शन जमा झालेली आहे. लवकरच ही पेन्शन वितरित होईल. तर ओबीसी कॅटेगरीतील पेन्शन लवकरात लवकर येण्यासाठी प्रयत्न चालू आहेत, तीही पेन्शन लवकरात लवकर जमा केली जाईल, अशी माहिती समिती अध्यक्ष मंदार केणी यांनी दिली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!