स. का. पाटील यांचे कार्य प्रेरणादायी ; प्राचार्या उज्ज्वला सामंत
मालवण (प्रतिनिधी) : स. का. पाटील यांचे व्यक्तिमत्त्व केवळ कोकणच नव्हे तर सर्व युवकांसाठी प्रेरणादायी आहे, असे मत प्रतिपादन सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या श्रीमती उज्ज्वला सामंत यांनी केले.
येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात कै. स का. पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्वला सामंत यांनी स.का. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महाविद्यालयाला स. का. पाटील यांचे नाव देण्यात आल्यापासून त्यांची पार्श्वभूमी आणि त्यांचे योगदान प्राचार्यांनी आपल्या भाषणामध्ये स्पष्ट केले. प्राध्यापक एचएम चौगुले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्राध्यापक डॉ. सुमेधा नाईक यांनी स. का. पाटील यांच्या कोकणातून चालू झालेल्या प्रवासापासून केंद्रीय मंत्री पदापर्यंत झालेल्या प्रगती मधून सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे, असे प्रतिपादन केले. प्राध्यापक बी एच चौगुले यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.