आडवली-मालडी जि. प. विभागाच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे भव्य स्वागत करणार !
पं. स. गटनेते सुनील घाडीगांवकर यांची माहिती
मालवण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा २८ ऑगस्टला मालवण तालुक्यात दाखल होत आहे. यावेळी आडवली-मालडी जिल्हा परिषद विभागाच्या वतीने आचरा तिठा येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे भव्य दिव्य स्वरूपात स्वागत केले जाणार आहे, अशी माहिती मालवण पंचायत समिती गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी दिली आहे.
सुनील घाडीगांवकर यांच्या शिरवंडे येथील निवास्थानी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांची नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या स्वागताचे नियोजन करण्यात आले. कोरोना काळ लक्षात घेता प्रशासन स्तरावरील खबरदारी नियम पाळून भव्य दिव्य स्वरूपात मंत्री नारायण राणे यांचे स्वागत करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. शनिवारी २८ ऑगस्ट रोजी दुपारी आचरा तिठा येथे भव्य दिव्य स्वरूपात मंत्री नारायण राणे यांचे स्वागत केले जाईल. अशी माहिती सुनील घाडीगांवकर यांनी दिली आहे. या सोबतच जनआशीर्वाद यात्रा मार्गावर नियोजित ठिकाणी तालुक्यातील सर्व जिल्हापरिषद, पंचायत समिती विभाग, मालवण शहर यांच्या वतीनेही उत्स्फूर्तपणे राणे साहेबांचे स्वागत होणार असल्याचे सुनील घाडीगांवकर यांनी सांगितले.