शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह ; मालवणात भरपावसात वैभव नाईकांच्या स्वागताला तुडुंब गर्दी
“कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला”, ढोलताशांचा गजरात आणि मोठ्या घोषणाबाजीत आ. नाईकांचे स्वागत
कुणाल मांजरेकर
मालवण : “आवाज कुणाचा, शिवसेनेचा”, “शिवसेना जिंदाबाद”, “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो”, “कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला”, “वैभव नाईक आगे बढो, हम तुम्हारे साथ है”, “नीम का पत्ता कडवा है, एकनाथ शिंदे XXX है” अशा गगनभेदी घोषणा करीत मालवण शहरात शिवसैनिकांनी प्रचंड उत्साहात आमदार वैभव नाईक यांचे स्वागत केले. भरड नाका येथून शिवसेना शाखेपर्यंत यावेळी रॅली काढण्यात आली. शहरात आज प्रचंड पाऊस असतानाही आ. वैभव नाईकांच्या स्वागतावेळी शिवसैनिकांमधील उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता, हे आजच्या शिवसेनेच्या रॅलीचे वैशिष्ट्य ठरले.
शिवसेना नेते तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील अनेक आमदारांनी बंड करत शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले आहे. राज्यातील सत्तानाट्यात शिवसेनेचे अनेक मंत्री देखील एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले असताना आमदार वैभव नाईक मात्र शिवसेनेशी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. या पार्श्वभूमीवर शनिवारी कुडाळमध्ये शिवसेनेच्यावतीने वैभव नाईक यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
यानंतर रविवारी वैभव नाईक मालवणात दाखल होताच ढोल ताशांच्या गजरात आणि प्रचंड घोषणाबाजीत शिवसैनिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. भरड नाक्यावर आयोजित केलेल्या या स्वागत सोहळ्याला शिवसेना तालुका प्रमुख हरी खोबरेकर, उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, महेश जावकर, पंकज सादये, नरेश हुले, आकांक्षा शिरपुटे, शीला गिरकर, गणेश कुडाळकर, भाई कासवकर, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, शहर प्रमुख मंदार ओरसकर, अमेय देसाई, महिला उपसंघटक सेजल परब, महिला समन्वयक पुनम चव्हाण, सौ. शिल्पा खोत, सुनीता जाधव, प्रवीण लुडबे, आतु फर्नांडिस, नीनाक्षी शिंदे, सन्मेष परब, बाबा सावंत, किरण वाळके, गौरव वेर्लेकर, बाळू नाटेकर, उमेश मांजरेकर, यशवंत गावकर, दीपक देसाई, भगवान लुडबे, सुहास वालावलकर, नंदा सारंग, अंजना सामंत, पुजा तळाशीलकर, प्रसाद आडवणकर, अक्षय भोसले, अक्षय सातार्डेकर, सुरेश मडये, दत्ता पोईपकर, बंड्या सरमळकर, स्वप्निल आचरेकर आदींसह अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.