शिवसेनेचं उद्या मालवणात शक्तीप्रदर्शन ; वैभव नाईकांचं होणार जल्लोषी स्वागत

कुणाल मांजरेकर

मालवण : शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या आमदार वैभव नाईक यांचं उद्या (रविवारी) मालवणात आगमन होत आहे. यानिमित्ताने शिवसेनेच्या वतीने शहरात मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असून वैभव नाईक यांचं जल्लोषी वातावरणात स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काही शिवसेना आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट केला आहे. मात्र आमदार वैभव नाईक यांच्यासह अन्य आमदार व सर्व नेतेमंडळी शिवसेना पक्षासोबत ठाम राहिले आहेत. कोणतेही आमिष व प्रलोभने यांना बळी न पडणारे निष्ठावंत आमदार वैभव नाईक हे रविवारी सकाळी मालवण दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर सकाळी १०.३० वाजता मालवण भरडनाका येथे आमदार नाईक यांचे मालवण शिवसेनेच्या वतीने स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर मालवण शिवसेना शाखा येथे बैठक होणार आहे. त्यावेळी आमदार वैभव नाईक मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी शिवसेना प्रेमी व शिवसैनिक यांनीही उपस्थित राहावे, असे आवाहन हरी खोबरेकर यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!