विधानपरिषद निवडणूकीतील भाजपच्या अभूतपूर्व विजयाचे मालवणात “सेलिब्रेशन”

देवेंद्र फडणवीस आगे बढो, हम तुम्हारे साथ है ; कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

फटाक्यांची आतिषबाजी करीत विजयाचा जल्लोष साजरा

कुणाल मांजरेकर

मालवण : विधान परिषद निवडणूकीत भाजपाने महाविकास आघाडीला धोबीपछाड देत आपल्या पाचही जागा निवडून आणल्या आहेत. भाजपच्या या अभूतपूर्व विजयाचे मालवणात सोमवारी रात्री सेलिब्रेशन करण्यात आले. “देवेंद्र फडणवीस आगे बढो, हम तुम्हारे साथ है ” अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. भरड नाक्यावर झालेल्या विजयी जल्लोषात फटाक्यांची एकच आतिषबाजी करण्यात आली.

विधानपरिषद निवडणूकीत भाजपाचा पाचही जागांवर विजय झाला असून महाविकास आघाडीची मते फुटून काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची रणनीती भाजपच्या विजयाला महत्वपूर्ण ठरली. सोमवारी रात्री हा निकाल जाहीर होताच मालवण येथील भरड नाक्यावर भाजपच्या वतीने एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत फटक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, प्रभारी शहर मंडल अध्यक्ष विजय केनवडेकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, भाऊ सामंत, बबलू राऊत, पंकज पेडणेकर, अभय कदम, प्रमोद करलकर, विलास मुणगेकर, आबा हडकर आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!