भाजपच्या वतीने उद्या मालवणात बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

माजी खा. निलेश राणेंची उपस्थिती

मालवण : भाजपाच्या वतीने बुधवारी १५ जून रोजी सकाळी ११ वाजता कोणार्क रेसिडन्सी येथील शहर कार्यालयात मालवण शहरातील बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे उपस्थित राहणार आहेत. 

यावेळी बारावी मध्ये प्रथम क्रमवारीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी मालवण शहरातील सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, लोकप्रतिनिधी व भाजपा पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रभारी शहराध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, भाजयुमो शहराध्यक्ष ललित चव्हाण यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!