केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईकांकडून केंद्र सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद
हडी ग्रामपंचायतीत कार्यक्रम ; योजनांमधील अडचणींबाबत घेतली माहिती
कुणाल मांजरेकर
मालवण : केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी भारत सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला. मालवण तालुक्याच्या वतीने हडी ग्रामपंचायत कार्यालय येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केंद्र सरकारच्या विविध योजना थेट ग्रामस्थांपर्यंत पोहोचतात की नाही ? त्यात कोणत्या प्रकारच्या अडचणी आहेत ? याबाबत केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी माहिती घेतली.
यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, राजू राऊळ, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, सरपंच महेश मांजरेकर, विलास हडकर, किशोर नरे, प्रकाश तोंडवळकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी केंद्र सरकारी योजनांचा लाभ मिळाल्याबद्दल सरकारचे आभार व्यक्त केले. किसान सन्मान योजना, प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला गॅस योजना, मातृ वंदना योजना, जल जीवन मिशन या सारख्या योजनांचा तसेच कोविड लसीकरण, गावात झालेला धान्यपुरवठा या योजनां बाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.