केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा जाहीर
सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) – केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम व उद्योगमंत्री नारायण राणे हे दि. 27 ऑगस्ट 2021 ते 29 ऑगस्ट 2021 पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दिनांक 27 ऑगस्ट 2021 रोजी रात्री सोईनुसार कणकवली येथे आगमन व मुक्काम. शनिवार दिनांक 28 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 09.00 वा. कणकवली शहर येथून सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 10.00 वा. खारेपाटण, कणकवली, तरेळे, वैभववाडी, फोंडा, कणकवली शहर, देवगड, तळेबाजार, कुणकेश्वर, मालवण, कुडाळ, कोलगाव, सावंतवाडी, तुळसमार्गे सार्वजनिक कार्यक्रम. रात्री सोईनुसार कणकवली येथे मुक्काम. रविवार दिनांक 29 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 09.30 वा. कणकवली येथून वागदे गोपुरी आश्रमकडे प्रयाण. सकाळी 10.00 वा. वागदे गोपुरी आश्रम येथे आगमन. त्यानंतर एमआयडीसी, बांदा, आडेली एमआयडीसी, दोडामार्ग,- गांधी चौक, सलोली, हनखणे, हसापुर, चांदेल, खारबांदा धारगल हायवेमार्गे, मलबार, शिरोडा, वेंगुर्ला येथे कार्यक्रम. रात्री सोईनुसार सिंधुदुर्ग येथे मुक्काम.