… असा असेल जन आशीर्वाद यात्रेचा मालवण मधील प्रवास !
कुणाल मांजरेकर
मालवण : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील जन आशीर्वाद यात्रा शनिवारी मालवण तालुक्यात दाखल होत आहे. राणेंची मुख्यमंत्र्यांवरील टीका, शिवसेनेचे राणेंविरोधात प्रखर आंदोलन आणि त्यानंतर राणेंवरील अटकेची कारवाई यानंतर खंडित झालेली जन आशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू होत असल्याने भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यात्रेचा मालवण तालुक्यातील प्रवास भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी जाहीर केला आहे.
शनिवारी २८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता ही यात्रा आचरा येथून मालवण तालुक्यात दाखल होत आहे. याठिकाणी मालवण तालुक्याच्या वतीने यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर ही यात्रा २.४५ वाजता मालवण शहरात दाखल होईल. मालवण शहरात भरड नाका येथे या यात्रेचे जोरदार स्वागत करून बाजार पेठमार्गे फोवकांडा पिंपळ करून ही यात्रा कुंभारमाठ येथे ३.३० वा. दाखल होईल. कुंभारमाठ येथे स्वागत केल्यानंतर यात्रा चौके येथे ३. ४० वाजता जाईल. चौके येथे स्थानिक पदाधिकाऱ्यां मार्फत स्वागत करून मालवण कट्टा येथे ४ वाजता यात्रेचं भव्य स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती श्री. चिंदरकर यांनी दिली आहे.