यतीन खोत यांची वचनपूर्ती : बसस्थानका समोरील दलितवस्ती रस्त्याचे नूतनीकरण पूर्ण
नगरोत्थान जिल्हा स्तर निधीतून १६.३७ लाख रुपये खर्च ; स्थानिकांनी व्यक्त केले समाधान
कुणाल मांजरेकर
मालवण : शहरातील बसस्थानका समोरील जुन्या कुडाळकर हायस्कूल कडे जाणाऱ्या दलित वसाहतीमधील रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे येथील नागरिकांना दिलेल्या शब्दा प्रमाणे माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी नगरोत्थान जिल्हा स्तर निधीतून १६ लाख ३७ हजार रुपये खर्चून या रस्त्याचे डांबरीकरण आणि मजबुतीकरण करून घेतले आहे. नगरपालिका निवडणूकीपूर्वी कोणत्याही परिस्थितीत हा रस्ता सुस्थितीत करण्याचा शब्द श्री. खोत यांनी दिला होता. या कामाच्या पुर्ततेबद्दल स्थानिक नागरिकांनी यतीन खोत यांचे आभार मानले आहेत.
मालवण बस स्थानका समोरच्या जुन्या कुडाळकर हायस्कूल कडे जाणाऱ्या रस्त्यावर नेहमी पावसाळ्यात पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण होत होते. यामुळे रहिवाशांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नगरपालिका निवडणूकीपूर्वी रस्त्याची उंची वाढवून हा रस्ता सुस्थितीत करून देण्याचा शब्द तत्कालीन बांधकाम सभापती यतीन खोत यांनी नागरिकांना दिला होता. त्यानुसार अलीकडेच या कामाचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत यतीन खोत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. हे काम पूर्ण करण्यात आले असून याठिकाणी पाणी साचून नागरिकांना होणार त्रास कायमस्वरूपी दूर झाला आहे. माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी दिलेला शब्द पाळल्याबाबत स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान या कामाच्या पुर्ततेबाबत यतीन खोत यांनी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि नगरपालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.