रेवतळे फाटक शाळा कंपाउंड वॉलचे उदघाटन

मालवण : मालवण शहरातील रेवतळे फाटक शाळा याठिकाणी नगरपालिकेच्या वतीने ५ लाख रुपये खर्चून करण्यात आलेल्या कंपाउंड वॉलचे उद्घाटन गुरुवारी करण्यात आले.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून या कामासाठी निधी उपलब्ध झाला होता. त्यासाठी आमदार वैभव नाईक, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी पाठपुरावा केला. याप्रसंगी उमेश मांजरेकर, हरी चव्हाण, गोगटे मॅडम, अनिकेत फाटक, माजी नगरसेविका शीला गिरकर, पॉली गिरकर, गोपी देसाई, राजन बादेकर, श्री. वरावडेकर यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!