जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक हालचालींना वेग : प्रभाग रचना जाहीर
मालवण तालुक्यात ७ जि. प. तर १४ पं. स. मतदार संघ होणार
मालवण : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक हालचालीना वेग आला आहे. प्रशासनाकडून प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार मालवण तालुक्यात जिल्हा परिषदेचे ७ तर पंचायत समितीचे १४ मतदार संघ असणार आहेत. त्यामुळे नवीन प्रभाग रचनेत तालुक्यात जिल्हा परिषदेचा एक तर पंचायत समितीचे दोन मतदार संघ वाढले आहेत. नवीन रचनेत मतदार संघात काही बदल करण्यात आले आहेत. हा आराखडा तहसीलदार कार्यालय व पंचायत समिती येथे प्रसिद्ध करण्यात आला असून २ जून ते ८ जून या कालावधीत यावर हरकती नोंद केल्या जाणार आहेत.
असे असतील नवीन मतदार संघ
जिल्हा परिषद मतदार संघ – आडवली -मालडी, आचरा, मसुरे-मर्डे, सुकळवाड, गोळवण, पेंडूर, वायरी भूतनाथ. पंचायत समिती मतदार संघ– आडवली मालडी, शिरवंडे, चिंदर, आचरा, कोळंब, मसुरे मर्डे, पोईप, सुकळवाड, गोळवण, चौके, पेंडूर, वराड, कुंभारमाठ, वायरी भूतनाथ