२५ वर्षीय तरुणाचा गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह
मालवण : गवंडीवाडा येथील शुभम अरुण शिंदे (वय २५) या तरुणाचा मृतदेह गुरुवारी सकाळी गवंडीवाडा येथील घराच्या बाहेर गळफास लावलेल्या स्थितीत शुभम याच्या आईला दिसून आला. याबाबत मालवण पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलीस हवालदार हेमंत पेडणेकर हे घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. शुभम हा मासेमारी नौकेवर खलाशी म्हणून कामाला होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी व दोन लहान मुली असा परिवार आहे. शुभम याच्या वडिलांनी घटनेची माहिती मालवण पोलिसांना दिली असून पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, हवालदार हेमंत पेडणेकर अधिक तपास करत आहेत.