सिंधुरत्न योजना अध्यक्ष आ. दीपक केसरकर उद्या मालवण नगरपालिकेला भेट देणार

मच्छिमार, व्यापारी, जलक्रीडा व्यावसायिक, बचत गट महिला प्रतिनिधींशी चर्चा करणार ; आ. वैभव नाईकांचीही उपस्थिती

मालवण : माजी पालकमंत्री तथा सिंधुरत्न योजना समितीचे अध्यक्ष आ. दीपक केसरकर हे उद्या सोमवार दि. ३० मे रोजी सकाळी ९ वाजता आमदार वैभव नाईक यांच्यासमवेत मालवण नगरपालिकेला भेट देणार आहेत.

यावेळी सिंधुरत्न योजनेच्या अनुषंगाने मालवण शहरातील सर्व मच्छीमार, व्यापारी, जल क्रीडा व्यवसायिक आणि बचत गटाच्या महिला प्रतिनिधी यांनी सिंधुरत्न योजनेच्या अनुषंगाने आपले विचार, प्रस्ताव देण्यासाठी नगरपालिका सभागृहामध्ये उपस्थित रहावे, असे आवाहन मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!