किर्लोस आंबवणे रस्त्याचा प्रश्न मार्गी ; बाळा लाड यांचा पाठपुरावा
माजी बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांतून ५ लाखाचा निधी
कुणाल मांजरेकर
मालवण : जिल्हा परिषदेचे माजी वित्त आणि बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून किर्लोस आंबवणे रस्त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून ५ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. या कामासाठी भाजपा नेते बाळा लाड यांनी पाठपुरावा केला. भाजपाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत परब यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
गेली कित्येक वर्षे हा रस्ता वाहतुकीस अत्यंत धोकादायक झालेला होता. ही बाब बाळा लाड यांनी लक्षात आणून दिल्यानंतर या रस्त्यासाठी माजी बांधकाम सभापती महेंद चव्हाण यांनी विशेष लक्ष देवून निधी उपलब्ध दिला. तसेच माजी उपसभापती राजू परुळेकर यांनीही वेळोवेळी रस्त्याच्या बाजूला वाढलेली झाडी व खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्न केले. याप्रसंगी युवा नेते सुशांत घाडीगांवकर, असगणीचे माजी सरपंच राजेश तांबे, तुषार हाटले, आंबवणेवाडी सेवा मंडळ मुंबईचे खजिनदार शंकर लाड, बुथ अध्यक्ष प्रविण घाडीगांवकर, बाळा घाडीगांवकर, छोटू किर्लोस्कर, शुभम बाक्रे, ग्रा. पं. सदस्य भास्कर लाड व ग्रामस्थ उपस्थित होते. बाळा लाड व प्रविण घाडीगांवकर यांनी सतत केलेल्या पाठपुराव्याचे महेंद्र चव्हाण यांनी विशेष कौतुक केले आहे. हे काम चालू झाल्यामुळे ग्रामस्थामधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.