कारच्या धडकेत मोटरसायकल वरील दोघे युवक जखमी ; एकाला गंभीर दुखापत

मालवण खैदा येथील दुर्घटना ; जखमी युवकांना पडवेला हलवले

मालवण : भरधाव वेगाने महानकडून मालवणच्या दिशेने येणाऱ्या व्हॅगनार कारने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत दोघे युवक जखमी झाले आहेत. यातील एका युवकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडला.

मालवण तालुक्यातील घुमडे कातवड येथील वंदन बिरमोळे आणि महादेव जाधव हे दोघे युवक मोटरसायकलने मालवणात आले होते. सायंकाळी ते घरी परतत असताना खैदा येथे समोरून भरधाव वेगाने आलेल्या महान येथील व्हॅगनार कारने त्यांच्या मोटरसायकलने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत वंदन बिरमोळे या युवकाच्या पायाला तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर त्याच्या मागे बसलेल्या महादेव जाधव याच्या डोळ्याच्या बाजूला दुखापत झाली आहे. दोन्ही युवकांना उपचारासाठी मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. याठिकाणी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. यावेळी वंदन बिरमोळे याच्या पायाची दुखापत गंभीर असल्याने या दोघानाही पडवे येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातानंतर घुमडे ग्रामस्थ आणि नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!