रेवतळे चंडिका मांड रस्त्याच्या कामाला चालना ; नागरिकांतून समाधान

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, यतीन खोत यांच्याकडून पाहणी

मालवण : मालवण शहरातील रेवतळे येथील नंदू गवंडी घर ते चंडिका मांड रस्त्याची दुरवस्था झाल्याने या रस्त्याचे नूतनीकरण करण्याची मागणी स्थानिकांतून करण्यात येत होती. त्यानुसार पालिकेच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून या कामाला २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात आले. या कामाला माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्यासह शिवसेनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन हे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून घेतले. या कामासाठी यतीन खोत यांनी पाठपुरावा केला.

या पाहणीवेळी शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी, उमेश मांजरेकर यांच्यासह अन्य नागरीक उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!