मालवण शहराला मिळाला अत्याधुनिक अग्निशमन बंब

आ. वैभव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ ; नागरिकांसह व्यापारी वर्गाने व्यक्त केले समाधान

मालवण : आमदार वैभव नाईक यांच्या विशेष प्रयत्नातून मालवण नगरपालिकेला प्राप्त अत्याधुनिक अग्निशमन बंबचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी करण्यात आला.

यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, व्यापारी संघाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटये, नाना पारकर, रवी तळाशीलकर, गणेश प्रभुलीकर, बाळू अंधारी, सरदार ताजर, महेंद्र म्हाडगूत, युवासेना शहर प्रमुख मंदार ओरसकर, माजी नगरसेविका सेजल परब, शिल्पा खोत, पूनम चव्हाण, शिला गिरकर, तृप्ती मयेकर, आकांक्षा शिरपुटे, सुनीता जाधव, नितीन वाळके, पंकज सादये, किरण वाळके, भाई कासवकर, नरेश हुले, संमेश परब, तपस्वी मयेकर, अमेय देसाई, यशवंत गावकर, प्रसाद आडवणकर, उमेश मांजरेकर यासह व्यापारी बांधव व नागरिक उपस्थित होते.

ज्या नगरपालिकाना यापूर्वी राज्य शासन निधीतून अग्निशमन बंब दिला असेल तर पुन्हा दुसरा अग्निशमन बंब देता येत नाही. या शासन निर्णयामुळे मालवण नगरपालिकेला पालिका अग्निशमन बंब जीर्ण व निर्लेखीत होऊनही दुसरा बंब मिळण्यात अडचणी होत्या. पालिकेचे उत्पन्न मर्यादित असल्याने स्व उत्पनातून ७० लाख पेक्षा जास्त किमतीची अग्निशमन यंत्रणा खरेदी शक्य नव्हते. ही बाब विचारात घेता आमदार वैभव नाईक यांनी याप्रश्नी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले. शासन निर्णयात बदल करण्याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू ठेवला. अखेर राज्य सरकारने पूर्वीच्या निर्णयात बदल केला. जीर्ण निर्लेखीत अग्निशमन वाहने झाली असतील तर त्या नगरपालिकाना राज्य शासन निधीतून नवी अग्निशमन बंब साठी निधी उपलब्धतेस मान्यता दिली. त्या निर्णयानंतर पाहिला अग्निशमन बंब मालवण पालिकेस उपलब्ध झाला आहे. अशी माहिती माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर तसेच मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांनी दिली. अग्निशमन बंब उपलब्ध झाल्याबाबत व्यापारी प्रतिनिधी व उपस्थित नागरिकांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले.

मालवण पालिकेस कायद्यात बदल करून नवा अग्निशमन मिळाला. मात्र हा अग्निशमन बंब वापर न झालेला बरा. कुठेही आग लागून कोणाचेही नुकसान होऊ नये. अशी भावना आमदार वैभव नाईक यांनी या निमित्ताने व्यक्त केली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!