अखेर कसाल- हेदूळ – खोटले – वायंगवडे- कट्टा मार्गे मालवण बसफेरी पूर्ववत

वायंगवडे माजी सरपंच गणपत सुद्रीक यांच्यासह महेश सारंग यांचा पाठपुरावा

कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण आगारातील कसाल- हेदूळ – खोटले – वायंगवडे- कट्टा मार्गे मालवण बस फेरी बंद असल्याने ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन वायंगवडेचे माजी सरपंच गणपत सुद्रीक आणि किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे ही बसफेरी पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.

सदरील बसफेरी बंद झाल्याने परिसरातील ग्रामस्थांची गैरसोय होत होती. मात्र ही बस पूर्ववत सुरू झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ही बसफेरी सुरू करण्यासाठी गणपत सुद्रीक, महेश सारंग यांनीही पाठपुरावा केला. यावेळी चालक, वाहक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गणपत सुद्रीक यांच्यासह प्रकाश राणे, ज्ञानदेव परब, विजय परब, विजय सावंत आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!