मंदार केणींचा वाढदिवस सामजिक उपक्रमांनी साजरा

शिवसेना शाखेत केक कापून पदाधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा

कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण नगरपालिकचे माजी बांधकाम सभापती तथा संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष मंदार केणी यांचा वाढदिवस बुधवारी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. तसेच शिवसेना शाखेत मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

मेढा जय गणेश मंदिर येथे रस्त्यावर फुले, नारळ विकणाऱ्या महिलांचे उन पावसापासून संरक्षण होण्याच्या उद्देशाने मंदार केणींच्या हस्ते त्यांना मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. तसेच ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, यतीन खोत, पंकज सादये, उमेश मांजरेकर, महेश जावकर, सन्मेश परब, प्रसाद आडवणकर, मनोज मोंडकर, यशवंत गावकर, बंड्या सरमळकर, नरेश हुले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय शिवसेना शाखेत आणि दांडी किनारपट्टीवर बीच रनवेळी मंदार केणी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यासह दांडी ग्रामस्थ, पर्यटन व्यावसायिक व नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!