सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी अजय शिंदे

जिल्हा सचिवपदी विजय मयेकर : नूतन कार्यकारणीची बिनविरोध निवड

कुणाल मांजरेकर

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी अजय शिंदे तर जिल्हासचिव पदी विजय मयेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या नुतन कार्यकारणी निवडीसाठी राज्य अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निवडणूक अधिकारी टी. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी सिंधुदुर्गनगरी येथे अध्यापक संघाचा जिल्हा मेळावा आयोजित केला होता. या जिल्हा मेळाव्याचे औचित्य साधून दुसऱ्या सत्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांमधून कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
जिल्हा अध्यक्ष- अजय मधुकर शिंदे (कुडाळकर हायस्कूल मालवण), जिल्हा सचिव – विजय लक्ष्मण मयेकर (कुडाळ हायस्कूल कुडाळ), उपाध्यक्ष – विश्वनाथ सावंत (कोनाळकट्टा), संजय परब (वेतोरे हायस्कूल), सुदिन पेडणेकर (कणकवली), जयदीप सुतार (वैभववाडी), सहसचिव – भाऊसाहेब चवरे, खजिनदार – सतीश शिंदे, महिला आघाडी प्रमुख – माधुरी खराडे, सदस्य- विमल शिंगाडे, विशाल पारकर, शिवराम सावंत, रामचंद्र भानुसे, सुनील बारटक्के , सल्लागार- गुरुनाथ पेडणेकर, नारायण माने, तानाजी पाटील, फेडरेशन प्रतिनिधी – अशोक गीते, प्रकाश कानूरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी टी. के. पाटील व लक्ष्मण पावसकर यांनी ही कार्यकारणी जाहीर केली.

यावेळी नूतन अध्यक्ष अजय शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना संघटना ही प्रत्येक कर्मचाऱ्याच्या हृदयात असली पाहिजे. एकसंघ असल्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही. एकसंघ राहून संघटना मजबूत करण्यासाठी आपण वेळ देणार असून जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. संघटनेला उर्जितावस्थेमध्ये आणून जिल्ह्यातील कर्मचार्‍यांचे कोणतेही प्रश्न प्रलंबित राहणार नाही यासाठी सतत प्रयत्न करणार असल्याचे अजय शिंदे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पी. व्ही. कांबळे यांनी केले तर आभार नूतन सचिव विजय मयेकर यांनी मानले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!