गवंडीवाड्यातील “तो” धोकादायक वीजेचा पोल बदलला ; अमेय देसाईंचा यशस्वी पाठपुरावा

कुणाल मांजरेकर

मालवण : शहरातील गवंडीवाडा आशापार्क परिसरातील धोकादायक वीजेचा पोल अखेर महावितरणने बदलला आहे. या धोकादायक पोलाकडे युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई यांनी महावितरणचे लक्ष वेधत पाठपुरावा केला होता.

भरड ते गवंडीवाडा रोड वरील आशापार्क कंपाऊंड मधील PH 8 हा पोल अवकाळी पाऊस, वारा यामध्ये झाड मोडून वाकला होता. हा पोल स्टे च्या साहाय्याने ओढून ठेऊन त्या परिस्थितीत तात्पुरत्या स्वरूपात चालू करण्यात आला होता. मात्र येथून विद्युत पुरवठा सुरू असल्याने हा स्टे तुटल्यास चालू लाईन खाली रस्त्यावर पडून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. हे लक्षात घेऊन युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई यांनी हा पोल बदलण्यासाठी महावितरणला निवेदन देत पाठपुरावा केला. अखेर या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन महावितरणने तात्काळ पोल बदलण्याची कार्यवाही पूर्ण केली आहे. याबद्दल स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!