माजी वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांची वचनपूर्ती ; रामगड होळी रस्त्यासाठी २.५० लाखांचा निधी

माजी उपसभापती राजू परुळेकर यांचा पाठपुरावा ; ग्रामस्थांतून समाधान

कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण तालुक्यातील रामगड होळी रस्त्याची दुरवस्था झाल्याने या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही जि. प. चे माजी वित्त आणि बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी दिली होती. महेंद्र चव्हाण यांनी दिलेला शब्द पाळला आहे. या रस्त्यासाठी जि. प. स्व निधी मधून २.५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

माजी उपसभापती राजू परुळेकर यांनी देखील या कामासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे ग्रामस्थांनी अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. सदर कामांचा शुभारंभ प्रसंगी भाजपचे विभागीय अध्यक्ष प्रशांत परब, गावप्रमुख अभय प्रभूदेसाई, सरपंच घाडीगांवकर, विस्तार अधिकारी पी. डी. जाधव, बुथ अध्यक्ष नरेश कामतेकर, बुवा घाडीगांवकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. या कामामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!