मसुरेत ग्रामस्थांच्या २५ वर्षांच्या मागणीला अखेर चालना ; खा. राऊत, आ. नाईकांचे मानले आभार
रमाई नदीतील गाळ उपसा करण्याच्या कामाला सुरुवात ; विनायक राऊत, वैभव नाईक यांनी केली पाहणी
कुणाल मांजरेकर
मालवण : बागायत देऊळवाडा ते मसुरे गडनदी पात्रास जोडणारे सुमारे ५ किलोमीटर लांबीचे रमाई नदीपात्र गेली अनेक वर्षे गाळाने बुजून गेले होते. त्यामुळे नदीपात्रातील गाळ उपसा करण्याची येथील ग्रामस्थांची गेल्या अनेक वर्षांची मागणी होती. अखेर आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून व खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून यावर्षीच्या जिल्हा नियोजनमधून रमाई नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. याठिकाणी प्रत्यक्षात गाळ काढण्याचे काम सुरु देखील झाले आहे. चार दिवसापूर्वी खा.विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी त्याठिकाणी भेट देत पाहणी केली. तब्बल २५ वर्षांची मागणी पूर्ण केल्याबद्दल सरपंच अदिती मेस्त्री व ग्रामपंचायत सदस्य अशोक मसुरकर यांनी गावच्या वतीने खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांचे यावेळी आभार मानले.
रमाई नदीच्या पाण्यावर येथील अनेक एकर शेती अवलंबून असायची. मात्र गेल्या काही वर्षात रमाई नदीचे पात्र गाळाने बुजत गेले. याचा परिणाम म्हणुन पावसाळ्यात मोठा पूर येत शेती बाधित तर उन्हाळ्यात कोरडी स्थिती असे चित्र गेली काही वर्षे दिसून येत होते. नदी पात्रातील गाळ उपसा करण्यात यावा यासाठी येथील ग्रामस्थ सातत्याने मागणी करत होते. देऊळवाडा ग्रामपंचायतीने सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा सुरू ठेवला. अखेर येथील गाळ उपसास प्रारंभ झाला असून ग्रामस्थ शेतकरी यांच्या माध्यमातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी माजी जि. प. सदस्य नागेंद्र परब, संग्राम प्रभुगावकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, सरपंच अदिती मेस्त्री, उपसरपंच नरेंद्र सावंत, ग्रा, प. सदस्य अशोक मसुरकर, चंद्रकांत राणे, मर्डे सरपंच संदीप हडकर, वर्षाराणी अभ्यंकर, दिलीप सावंत, तातू सावंत, राजेश चिंदरकर, नारायण परब, महेश बागवे, रावजी बागवे, रामदास सावंत, रंजना बागवे, उल्हास मेस्त्री, दिलीप सावंत, कृष्णा बागवे, संतोष काळसेकर, प्रफुल्ल सावंत, सोनू सावंत, विश्वनाथ सावंत, फटूजी बागवे, बाळकृष्ण् मुंडले, सदानंद कबरे, सोनूपंत बागवे, सुरेश घाडीगावकर, मनीषा बागवे, संदीपा कबरे, राजश्री सावंत, प्रसन्ना मेस्त्री, सानिका सावंत, अंकिता सावंत, अनिता सावंत, गीतेश्री मसुरकर व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.