ब्रिटीश राजवटीत पूर्वजांनी रोवले शिक्षणाचे बीज : खा. विनायक राऊत

कवठी प्राथमिक शाळेचा शतक महोत्सव दिमाखात संपन्न

संधी मिळेल तेव्हा शाळेसाठी सर्वांनी भरभरून योगदान द्यावे : आ. वैभव नाईक

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा कवठी नं. १ शाळेला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मंगळवारी शाळेचा शतक महोत्सव साजरा करण्यात आला. या शतक महोत्सवाला खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले, ब्रिटीश राजवटीत कवठी सारख्या दुर्गम गावात आपल्या पूर्वजांनी शाळेच्या माध्यमातून शिक्षणाचे बीज रोवले. आजच्या युगात मराठी माध्यमाच्या शाळांची प्रतिकूल परिस्थिती असतानाही हे शिक्षणाचे बीज पुढे नेण्याचे काम येथील ग्रामस्थ करत आहेत. संपूर्ण देशात आपला सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक क्षेत्रात अव्वल आहे. बदलती परिस्थिती लक्षात घेऊन आपल्या शाळेत विविध उपक्रमांतून मुलांवर चांगले संस्कार करण्यात येतात हे कौतुकास्पद आहे, असे त्यांनी सांगितले.

आमदार वैभव नाईक म्हणाले, प्रत्येक माणसाच्या जीवनात शिक्षणाला खूप महत्व दिले जाते. ज्या शाळेत आपण शिकतो, त्या शाळेचे आपल्यावर ऋण असतात. संधी मिळेल तेव्हा शाळेसाठी सर्वांनी भरभरून योगदान दिले पाहिजे. कवठी शाळेने अनेक विद्यार्थी घडविले, ते उच्च पदापर्यत पोहोचले. कवठी गावाला सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. मागच्या वेळी शाळा दुरुस्तीसाठी निधी दिला होता. शाळेमध्ये बदल घडत आहे. इ लर्निंग क्लासेस सुरु केलेले आहेत. येत्या काळातही शाळेसाठी जी जी मदत लागेल ती केली जाईल. शाळेत एक शिक्षक कमी असून लवकरच शिक्षक वाढवून देण्याची ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी दिली.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जि. प. सदस्य नागेंद्र परब, माजी उपसभापती जयभारत पालव, बबन बोभाटे, अतुल बंगे, गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, केंद्रप्रमुख हरमलकर, सरपंच रुपेश वाडयेकर, उपसरपंच भरत मेस्त्री, नेरूर सरपंच शेखर गावडे, चेंदवण सरपंच उत्तरा धुरी, प्रवीण खडपकर, मुख्याध्यापक सखी वारंग, राजा सामंत, दिनेश गोरे, संजय करलकर, मंजुनाथ फडके, कवठी बांदेकरवाडी येथे माजी नगरसेवक सचिन काळप, नितीन सावंत, गुरु गडकर, मंगेश बांदेकर, मितेश वालावलकर शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्यास संख्येने उपस्थित होते.

कवठी बांदेकरवाडी सभामंडपाचे भूमिपूजन

कवठी बांदेकरवाडी येथे सभामंडपासाठी २५/१५ ग्रामविकास निधी अंतर्गत ५ लाख निधी आ. वैभव नाईक यांनी मंजूर केला आहे. या कामाचे भूमिपूजन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!